Saturday, 7 December 2019

पानीपतच्या 'मर्द मराठा' गाण्याला ज्येष्ठ पार्श्वगायक सुदेश भोसले यांचा आवाज


ऐतिहासिक अश्या महाकाय युद्धाची कथा मांडणारा आगामी बॉलीवूड चित्रपट पानीपत हा लवकरच  प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्येष्ठ गायक सुदेश भोसले यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर अशी की, या चित्रपटात त्यांना सुदेश भोसले यांचा आवाज  ऐकायला मिळणार आहे. झिंग झिंगाट आणि चिकनी चमेली फेम संगीत- दिग्दर्शक जोडी अजय-अतुल यांनी सुदेश भोसले यांच्या आवाजात 'मर्द मराठा' हे गाणे रेकॉर्ड केले आहे. ह्या गाण्यात त्याचा आवाज एक प्रमुख भूमिकेसाठी आहे. हयाबद्दल सांगताना  सुदेश भोसले म्हणाले, “मला एक उत्साही आणि रोमांचकारी गाणे गाण्यासाठी अजय-अतुलचा फोन आला त्यांनी सांगितले हे गाणे विजय गीत आहे. जेव्हा मी स्टुडिओला पोहोचलो तेव्हा आशुतोष गोवारीकर तिथे पूर्वीच होते.मराठ्यांच्या युद्धामागील पानिपतची पार्श्वभूमी  त्यांनी काळजीपूर्वक स्पष्ट केली. या गाण्याच्या रेकॉर्डिंग दरम्यान खूप मजा आली म्हणूनच हे गाणे अपेक्षे प्रमाणे तयार झाले. अजय -अतुल यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. या गाण्याला आवाज दिलेल्या सर्व गायकांनी आपला भाग गायला पण प्रोमो बाहेर आल्यानंतरच मला कळले की हे गाणे अत्यंत उत्कृष्टरित्या तयार झाले आहे. ”

या गाण्याला सोशल मिडियावर चांगला प्रतिसाद मिळाला हे पाहता पुन्हा एकदा स्वतःचाच आवाज मोठ्या पडद्यावर वाजवताना पाहून आणि ऐकून सुदेश भोसले ठामपणे सांगतात,  की ही नेहमीच एक चांगली भावना असते! “मी स्वतः मराठा आहे. स्वाभाविकच, आपल्या इतिहासाबद्दल, आपल्या योद्धांविषयी आणि त्यांच्या महानतेबद्दल गाणे गायला मिळणे अभिमानाची गोष्ट आहे. हे गाणेही माझी स्टाईल प्रमाणेच ठरले! पॉवर पॅक आणि दमदार."

संगीत दिग्दर्शक जोडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, पानीपत या ऐतिहासिक चित्रपटाशी निगडित असल्याचा अभिमान  व्यक्त करत ते म्हणाले, "आजचे तरुण पद्मावत, बाजीराव मस्तानी इत्यादीसारखे ऐतिहासिक चित्रपट अत्यंत आवडीने पाहत आहेत. त्यांना आपल्या इतिहासाची जाणीव असली पाहिजे आणि या चित्रपटांच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. पानीपत युद्ध एक प्रसिद्ध युद्ध आहे."

No comments:

Post a Comment